कोल्हापुर

सुनेला एक कोटींची मागणी व छळ ; आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील यांच्यासह कुटुंबियांवर गुन्हा  दाखल : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

Rokhthok Maharashtra – कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील  उर्फ पी.एन. पाटील  यांच्यासह त्यांचा मुलगा राजेश आणि मुलगी टीना महेश पाटील यांच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदिती राजेश पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आदिती पाटील या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील  यांची पुतणी तर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. काँग्रेसच्या आमदारावर  गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, आदितीला शिवीगाळ करुन मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलिसात  तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरे पांडुरंग पाटील, पती राजेश पाटील आणि नणंद टीना पाटील अशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आदिती पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात  दिली आहे.

आदिती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती, सासरे व नणंद यांनी संगनमत करुन शारिरीक व मानसिक छळ केला आहे.
तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करुन मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या विविध कलमांन्वये संशियितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.