मुख्ययुवा

नीरज चोप्रा : नीरजच्या गोल्डन आर्मने दुसऱ्या फेकीतच जिंकले गोल्ड : तब्बल 13 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक

नीरज चोप्रा च्या गोल्डन आर्मने भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक गोल्ड जिंकत इतिहास रचला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक निश्चित केले. अॅथलॅटिक्समधले भारताचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी शूटर अभिनव बिंद्राने २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पहिले सुवर्ण पदक जिंकले होते.

आज अंतिम फेरीत त्याने पहिल्या प्रयत्नात ८७.3 मिटर भालाफेक करत आपल्या कामगिरीत सुधारणा केली. सध्या तो अंतिम यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल जर्मनीच्या जे वेबेर होता. त्याने ८५. ३० मिटर लांब भाला फेकला.  ८२.५२ मिटर भालाफेक करत जर्मनीचाच जे व्हेटेर तिसऱ्या स्थानावर राहिला.

त्यानंतर नीरज चोप्रा याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मिटर भालाफेक करत आपली सुवर्ण पदकाची दावेदारी अजून बळकट केली.  त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ७६.७९ मिटर भालाफेक केली. मात्र दुसऱ्या फेकीवेळी ८७.५८ मिटर भाला फेकल्याने ती फेकी सर्वोच्च म्हणून ग्राह्य धरली जाते.

तिसऱ्या फेकीत चेक रिपब्लिकच्या व्हेसलेने ८५.४४ मिटर भाला फेक करत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तिसऱ्या फेरीअंतीही नीरज चोप्रा अंतिम ८ च्या यादीत अव्वल स्थानावर होता. दुसऱ्या स्थानावर चेक रिपब्लिकच्या व्हेसले होता. तर जर्मनीचा जे वेबर तिसऱ्या स्थानावर राहिला. या तिघांच्यातच चुरस निर्माण झाली आहे.

अंतिम आठच्या यादीतील भालाफेक तळातून सुरु झाली. पण, नीरज चोप्रा ने टाकलेल्या ७८.५८ मिटर फेकीच्या जवळपास कोणी पोहचू शकले नाही.  चेक रिपब्लिकच्या वादलेचने पाचव्या प्रयत्नात ८६.६७ मिटर भालाफेक करत पुन्हा यादीत चुरस निर्माण केली. तो यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला. त्यानंतर जर्मनीच्या वेबरने ८५.१५ मिटर फेकी करत यादीतले आपले तिसरे स्थान पक्के केले.

शेवटची सहावी फेरी सुरु झाल्यानंतर सर्वांचीच धाकधूक लागली. पण, जसजसे इतर खेळाडू भालाफेक करत होते तसतसे नीरज चौप्रा ते सुवर्ण पदक निश्चित होत गेले. अखेरचा खेळाडू चेक रिपब्लिकचा वादलेच याचा फाऊल झाला आणि भाराताचे सुवर्ण पदक निश्चित झाले.