पुणे

राष्ट्रवादीच्या हडपसर विधानसभा महिला उपाध्यक्षपदी सविता मोरे

पुणे ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हडपसर विधानसभा महिला उपाध्यक्षपदी सविता अनिल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते मोरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष मृणालीनी वाणी, हडपसर विधानसभा महिला अध्यक्षा पूनम पाटील, महिला कार्याध्यक्ष वैष्णवी सातव, पुणे शहर सरचिटणीस वंदना मोडक आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा कार्यकारिणी आज अध्यक्षा पूनम पाटील यांनी जाहीर केली यामध्ये उपाध्यक्ष अश्विनी जगताप, तबसुम जमादार, रंजना राजेंद्र कोंडे, सरचिटणीस त्रिशला वर्मा, प्रभाग अध्यक्ष ललिता चिललाळ, चिटणीस मीनाक्षी आहिरे, यांचाही समावेश आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीबरोबर व पदाधिकारी निवड मध्ये आघाडी घेतली आहे, शहर कार्यकारिणी बरोबर महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून दोन प्रभाग सदस्य निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व्ह्यूरचना आखली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निवडणूक गांभीर्याने घेतल्याने शहर पदाधिकारी व आमदारांना निवडणुकीच्या दृष्टीने यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.