पुणे

उच्चशिक्षित युवकाकडून महिलेचा विनयभंग; हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

सकाळच्या वेळेस एक तरुणी आवडत्या कुत्र्याला फिरवत असताना एका विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने तिच्या समोर येऊन स्वतःची पॅन्ट काढून आपला  तिचा विनयभंग करून पळून गेला. हि घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमनोरा टाऊनशिप मध्ये घडली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तरुणीने अज्ञात तरुणा विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. यामधील अज्ञात आरोपीस सीसी टीव्ही कॅमेराच्या माध्यमातून दोन दिवसात हडपसर पोलिसांनी आरोपीस गजा आड केले आहे. 

गौरीशंकर अमुल्यकुमार महापात्रा (वय ३५, रा. माळवाडी, हडपसर) असे विकृत तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अमनोरा टाऊनशिप मध्ये सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक उच्च शिक्षित तरुणी तिच्या आवडत्या कुत्र्याला फिरवत होती. त्यावेळी अचानक गौरीशंकर समोर येऊन स्वतःची पॅन्ट काढून तरुणीला आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून तिचा विनयभंग करून पळून गेला. यावेळी त्या तरुणीची आई हि तिच्यापासून पुढे काही अंतरावर वॉकिंग करत होती. तरुणीने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. अश्या विकृत मनोवृत्तीला धडा शिकवण्यासाठी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामधील आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांना शोध घेणे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांनी परिसरात लोकसभातून बसवलेले सीसी टी व्ही कॅमेरा तपासणी केली. तब्बल ११५ कॅमेरे तपासण्यात आले. आरोपीचे वर्णन, गाडीचा रंग व मेक तसेच गाडीच्या नंबर वरून आरटीओ कडून माहिती काडून आरोपीस २ दिवसानंतर जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले. सदर आरोपीचे नाव गौरीशंकर अमुल्यकुमार महापात्रा हा उच्च शिक्षित असून तो व्होडाफोन कंपनीत उच्च पदावर नोकरीस आहे. अमनोरा टाऊनशिप मध्ये केलेला प्रकार आरोपी गौरीशंकरने कबूल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे उघडकीस आलेला आहे. सदरची कामगिरी हि हडपसर तपास पथकाने, अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांच्या सूचनेनुसार,  सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, संजय चव्हाण, पोलीस हवालदार युसूफ पठाण, संपत अवचारे, सदोबा भोजराव, गणेश दळवी, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अकबर शेख, अनिल कुसाळकर अमित कांबळे, शाहिद शेख ज्ञानेश्वर चित्ते यांनी केली आहे

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x