पुणे

प्रा. नम्रता मेस्त्री यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हडपसर:

एस. एम. जोशी कॉलेजमधील प्रा. नम्रता मेस्त्री यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्या एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी ” मराठी साहित्य प्रसारात आकाशवाणीचे योगदान : विशेष अभ्यास मुंबई आकाशवाणी 1990 ते 2010 “हा प्रबंध प्राध्यापक डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.