पुणे

हडपसर कोकणवासीय महासंघ व पुणेकर वासीयांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात

कोकण (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
कोकणातील पूरग्रस्त महाड पोलादपूर चिपळूण येथे मदत नव्हे कर्तव्य समजून चिपळूण मध्ये बहाद्दूर शेख नाका, दळवटने, इंगवलेवाडी, बडदेवाडी, आदिवासी पाडा, मोरवणे, महाड दादली, पोलादपूर येथे ब्लॅंकेट, चादर, टॉवेल, साड्या, टी शॉर्ट, भांडी, तेल, फिनाईल, झाडू, तसेच शालेय वस्तू , बिस्कीट चे वाटप करण्यात आले.
मदतीचा हात हडपसर कोकणवासीय महासंघाचे अध्यक्ष शिवसेना शाखाप्रमुख अजय सकपाळ, महाड, सभापती सीताराम कदम, पुणे शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे, सचिव विलास इंगवले, उपाध्यक्ष मनोहर बदडे, यांच्या प्रयत्नातून नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष सुनील उत्तेकर, गिरीश मोरे , धनंजय कणसे, मनोहर पवार, युवा उद्योजक जितेंद्र बहिरामकर, प्रतीक सकपाळ, निलेश पवार, शैलेश जाधव, सुनील बोबले, ज्ञानेश्वर सकपाळ, शुभम बडदे, लवू जाधव, दिपक जाधव, अंकुश जाधव, सुयोग उत्तेकर, अजय महाजन, अमित म्हामूनकर, सुहास शिंदे, संदीप मोरे, आदी यावेळी उपस्थित होते.
मदत नव्हे कर्तव्य समजून विशेष सहकार्य नगरसेवक मारुती आबा तुपे, उद्योजक चंद्रकांत जाधव, नगरसेवक अजित दरेकर, शिवसेना नेते संजय सपकाळ, गिरीश मोरे, प्रशांत बाजारे, मनोहर पवार, अजय उत्तेकर, प्रशांत मोरे सिम्पल पार्क सोसायटी सदस्य यांनी सहकार्य केले.

 

https://fb.watch/7zfR1HTtSV/