पुणे

गोविंद घोळवे यांची ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार गोविंद घोळवे यांची ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी पत्र देऊन घोळवे यांची ही नियुक्ती केली
गोविंद मदनराव घोळवे हे गेली पंचवीस वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत असून त्यांनी दैनिक पुढारी येथे 18 वर्षे तसेच सकाळ माध्यम समूहाचे राजकीय कार्यकारी संपादक म्हणून चार ते पाच वर्षे काम केले आहे, गेली सतरा वर्षे श्री क्षेत्र भगवान गडाचे सचिव म्हणून ते समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तीन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबर गोविंद घोळवे हे रशिया दौर्‍यावर गेले होते. श्री. घोळवे यांचा महाराष्ट्रातील राजकारण, अर्थकारण, समाजकारण, अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रामध्ये चांगला संपर्क आहे.
अत्यंत स्पष्ट वक्ते, सडेतोड व्यक्तिमत्त्व म्हणून देखील त्यांना पत्रकारितेमध्ये ओळखले जाते त्यांना महाराष्ट्र मध्ये पत्रकारीतेचे कार्य करतांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत आज त्यांना पुणे येथे ऑल इंडिया जर्नालिस्ट असोशियन चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आदी उपस्थित होते.