पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
November 20, 20210

Related Articles
October 29, 20220
कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ…!
पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
पुण्यातील कात्रज परिसरात एक धक्कादायक घटना
Read More
June 1, 20230
लोणी काळभोर हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या लोणी काळभोर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
प्रतिनिधी -स्वप्नील कदम
लोणी काळभोर - लोणी काळभोर हद्दीतील कुंजीर वाडी येथ
Read More
December 16, 20230
पूर्व हवेलीतील सोरतापवाडी येथे रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न …
प्रतिनिधी- स्वप्निल कदम
मौजे सोरतापवाडी(गुंजाळ मळा) ता.हवेली जि.पुणे येथे द
Read More