पुणे

तरुण-तरुणींनी कर्तृत्वाचे शिल्पकारांपासून प्रेरणा घेऊन, आपापल्या आयुष्यामध्ये आपले कुटुंब,समाज व आपल्या देशासाठी भविष्यात उत्तमोत्तम योगदान द्यावे – अनिलजी कवडे

सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वतोपरी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अनमोल रत्नांना निमंत्रित करून पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेला “कर्तुत्वाचे शिल्पकार, नाशिक भूषण” पुरस्कार सोहळा संपन्न.

पुरस्कार सोहळ्यामध्ये अध्यक्षस्थानी अनिलजी कवडे (भाप्रसे) आयुक्त महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण पुणे, आदरणीय पप्पाजी सु.द. पुराणिक (संस्थापक जयशंकर प्रतिष्ठान),
सौ. शुभांगी भारदे (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा नाशिक), संगीत दिग्दर्शक तसेच गायक आदि रामचंद्र आणि अभिनेते मकरंद पाध्ये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या (नाशिक) अध्यक्ष मीनल कुलकर्णी, सचिव प्रदीप कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी सदस्य शरद पवार व सहकारी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, कलाक्षेत्र, व्यवसाय, उद्योग आणि प्रामाणिक राजकीय प्रतिनिधी असलेल्या गुणवंतांना पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “कर्तृत्वाचे शिल्पकार”, “नासिक भूषण” पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीने शंकराचार्य कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.

या उपक्रमात महेंद्र विजय शेवाळे, सौ मंजिरी रवींद्र अहिरे आणि
डॉ. रणजीत जोशी यांना नाशिक भूषण…स्वप्निल देवरे, सौ.सोनल पारिक आणि श्री गौरव बुवा यांना शिक्षक भूषण, प्रवीण तिदमे, आदि रामचंद्र, श्रीमती कल्पना पांडे, डॉ शैलेंद्र गायकवाड, सुधीर मेथेकर, मकरंद पाध्ये, उमेश राऊत, प्रा. दिलीप ठाकूर, डॉ दिनेश सोनवणे, रज्जत शर्मा, सुहास टिपरे, कुनिका विजेंद्र पाठक, राहुल विवेक कुलकर्णी, प्रसाद देशमुख, गीत पराग पटणी, वृषाली वानखेडे, अमोल भाऊ भागवत, सचिन गोपाळ जाधव, सौ सुनंदा साहेबराव पाटील, सुनील निरगुडे, सौ स्मिता शेखर कुलकर्णी, सौ तृप्ती ढवण, कीर्ती राजगुरू, लीना बाळासाहेब पांडे, डॉ सौ गिरीशा शिंदे, सौ पुजा रत्नपारखी, कौस्तुभ भाकरे, सौ श्रद्धा शेळके कमानकर, सौ विजया येवलेकर, सौ नयना हाबू पुराणिक, साईप्रसाद कुंभकर्ण, सौ नीलम मनोज साठे, सौ ज्योत्स्ना राजेश नाईक, सौ कल्पना ज्ञानेश्वर पवार, नानासाहेब शामराव पवार, कैलास सुपारे, सौ निशिगंधा सुनील कापडणीस यांना कर्तृत्वाचे शिल्पकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशी आशा बाळगून, सदर कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रमातील मान्यवर आणि कार्यक्रमातील पुरस्कारार्थी यांच्या वतीने सामाजिक आवाहन केले गेले.