पुणे

पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही पूर्व आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासारखीच धडाकेबाज कामगिरी सुरु वारजे हद्दीत पहिली मोक्काची कारवाई…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांनीही माजी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याप्रमाणे मोक्का अंतर्गत कारवाईला सुरुवात करत पहिलीच कारवाई वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे ८ ते ९ साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात आरोपी व त्याचे साथीदार जुना जकात नाका, वारजे परिसरात फिर्यादीच्या घरासमोर आले होते पूर्वी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांच्यासोबत वादविवाद झाले होते, यावेळी आलेल्या आरोपी व साथीदारांनी जुना वाद उकरून काढताना जिवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच मारण्याच्या उद्देशाने दगड देखील फेकून मारला, मात्र फिर्यादीने तो दगड चुकवला, व आरोपीने तोच दगड उचलून फिर्यादीच्या मोटारसायकल ला फेकून माराला व गाडीचे नुकसान केले आहे.

यावेळी आरोपी सोबत असणाऱ्या साथीदारांपैकी एकाने हातातील कोयता फिरवताना फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली, व “पप्पुभाई हा इथला भाई आहे” असे म्हटले, “पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन “असे म्हणत परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरवताना आरडाओरडा करत निघून गेले,याबाबत फिर्यादीने वारजे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार आरोपी व त्याच्या साथीदारांवर भादवि कलम ३०७, ४२७.३३६, ३३७, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म ऍक्ट ४ (२५) म.पो. का. क ३७ (१) (३)/ १३५.क्रि. लॉ. अमे. ऍक्ट कलम ३ व ७ प्रमाणे वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता, म्हणून त्याच्यावर आज मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.