पुणे

आम आदमी पार्टी च्या वतीने फुरसुंगी – उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध..!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

फुरसुंगी – उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे सरकार ने घेतला आहे, या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या, फुरसुंगी – हडपसर, पुणे च्या वतीने निषेध आंदोलन घेन्यात आले, दिनांक 09 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9:00 च्या सुमारास भेकराई नगर चौक ,पुणे सासवड रोड, फुरसुंगी, हडपसर भागातील आम आदमी पार्टीचे फुरसुंगी हडपसर चे समन्वयक सचिन कोतवाल तसेच अस्मिता मांढरे, अशोक हरपळे यांनी आयोजन केले होते.

या निषेध आंदोलनात फुरसुंगी – उरुळी देवाची महानगर पालिकेत ठेवावे, स्वतंत्र नगरपरिषद नकोय अशी येथील नागरिकांची भूमिका आहे याची मांडणी केली, महानगर पालिकेने मोठ्या प्रमाणात टॅक्स घेऊन विकास कामे केली नाहीत, आणि ते अपयश झाकण्यासाठी वेगळ्या नगरपरिषदेचा घाट घातला जात आहे, फुरसुंगी कचरा डेपो वगळता इतर भाग नगरपरिषदेत असेल, यावरूनच हा निर्णय किती राजकीय आहे याची प्रचिती येते, पुणे शहरचा कचरा फुरसुंगीत आणि फुरसुंगी गाव महानगर पलिके बाहेर अशी अवस्था झाली आहे, सचिन कोतवाल यांनी आपल्या भाषणतून फुरसुंगी गाव महनगर पलिकेत ठेवा आणि त्यासाठी नागरिकांनी 30 दिवसात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किंवा आम आदमी पार्टी ऑफिस मध्ये हरकती अर्ज जमा करावेत असे आवाहन केले.

डॉ. अभिजित मोरे, आम आदमी पार्टी पुणे शहर समन्वयक यांनी केलेल्या भाषणामध्ये शासनाच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली, महानगर पालिकेने घेतलेल्या टॅक्स च्या पैस्यामधून सुविधा न देता तो भागच पलिके बाहेर काढण्याचा काम चालू आहे आणि इतर राजकीय प्रतिनिधी याला विरोध करताना दिसत नाहीत,
या निषेध आंदोलनात सरकारच्या निर्णयावर जोरदार विरोध केला गेला, यापुढे हा लढा अधिक तीव्र करण्याचा मानस येथील नागरिकांचा आहे.

या निषेध आंदोलनाला अशोक तात्या हरपळे, अस्मिता मांढरे, सुनील हरपळे, रवी लाटे, बालाजी कंठेकर व परिसरातील अनेक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.