पुणे

बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब आयोजित हडपसर सोसायटीज चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मध्ये “बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब विजेता “

 

बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब आयोजित हडपसर सोसायटीज चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मध्ये “बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब विजेता “
ही स्पर्धा चॅम्पियन फिल्ड ग्राउंड डी. पी. रोड माळवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत १६ सोसायट्यांच्या संघाने सहभाग घेतला होता.
आंतीम सामना हा बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब आणि यशराज ग्रीन कॅसेल सोसायटी यांच्या मध्ये झाला. आंतीम सामन्यात अष्टपैलू खेळाडू श्रेयस मिटकरी ,कर्णधार आदित्य पवार आणि सांघिक खेळीने बिनावत टाऊनशिप सोसायटी क्रिकेट क्लब ने १० गडी राखून विजय मिळवला.
वेंकटेश क्लासिक सोसायटी ने ड्रीम्स आकृती सोसायटीला हरवून तृतीय पारितोषिक जिंकले.

बेस्ट फलंदाज पारितोषिक निखिल पवार आणि बेस्ट गोलंदाज पारितोषिक राहुल कालसकर यांनी पटकावले.
सत्यराज निरंजनी सोसायटीचे चेअरमन श्री.संजय माळी यांनी उत्कृष्ठ समालोचन केले.
बिनावत टाऊनशिप सोसायटी चेअरमन श्री.संतोष ननावरे,सेक्रेटरी श्री.शरद फडतरे आणि सर्व सभासदांनी विजेत्या संघाचे आभिनंदन केले.