पुणे

लोणी काळभोर येथील सराईत गुन्हेगार संकेत सुनील गायकवाड पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर :लोणी काळभोर, हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे करत, दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

संकेत सुनील गायकवाड (वय २५ वर्ष, रा. कवडीपाट टोलनाका, गुजरवस्ती, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, तालुका हवेली जिल्हा पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

संकेत सुनील गायकवाड हा गुन्हेगारांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या गुंड साथीदारांसह कदमवाकवस्ती, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हे करत होता. तसेच दहशत निर्माण आपल्या साथीदारांसह धुमाकूळ घालत होता. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, संकेत सुनील गायकवाड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यावर त्यांनी त्याची पडताळणी करून २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे सर्व पिंपरी चिंचवड आयुक्तालय पुणे जिल्ह्यात दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला.

अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलिस स्टेशन राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस हवालदार सातपुते, पोलीस नाईक धनवटे यांनी कामगिरी पार पाडली .