पुणेहवेली

पुणे: हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर,प्रशासन सज्ज…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे ) : 

हवेली उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने आर्थिक लाभाचे प्रमाणही फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक पार पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, आजतागायत या ना त्या कारणाने तब्बल १८ वर्ष निवडणूक टाळण्यात प्रशासकीय बाबू यशस्वी झाले होते, निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, तसेच न्यायालयामध्ये गेलेला वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते.

त्यामुळे बाजार समिती ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची की, पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक विद्वान लोकांनी यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते, शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक ही २९ एप्रिल २०२३ रोजी घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे.

त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर होत असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून जाण्यात अनेक राजकीय पदाधिकारी इच्छुक आहेत, राजकारणातील ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत,त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

१८ उमेदवारांपैकी ११ उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत, यासाठी १३४ सोसायटीचे १ हजार ६५५ सदस्य मतदान करणार आहेत, ४ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत, हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य मतदान करणार आहेत, २ व्यापारी प्रतिनिधी आणि १ हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे, व्यापार प्रतिनिधींसाठी १३ हजार १७३ जण मतदान करणार आहेत, हमाल, तोलणार प्रतिनिधीसाठी १ हजार ५४९ हमाल आणि ३२९ तोलणार मतदान करणार आहेत.

बाजार समिती निवडणूक कार्यक्रम: जाहीर : २७ मार्च, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च ते ३ एप्रिल, उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिल, वैध उमेदवारी अर्जांची यादी : ६ एप्रिल, अर्ज माघारीची मुदत ६ ते २० एप्रिल, अंतिम यादी आणि चिन्हवाटप : २१ एप्रिल, मतदान : २९ एप्रिल मतमोजणी आणी निकाल : ३० एप्रिलला लागेल.