पुणे

पी. एम. आर. डी. ए. कडून मुळशीतील जांबे गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी पीएमआरडीए ) विभगा कडून मुळशी तालुक्यातील जांबे गावातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली, मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील गट क्रमांक ८९ पै. आणि ८४ पै. या ठिकाणी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून तळमजला आणि एक मजला असे ५७०० चौरस फुटांचे आणि वाणिज्य स्वरूपाचे सुमारे ४०५० चौरस फूटांचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट थॉरिटी पीएमआरडीए) मुळशी तालुक्यातील जांबे गावातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील गट क्रमांक ८९ पै. आणि ८४ पै. या ठिकाणी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून तळमजला आणि एक मजला असे ५७०० चौरस फुटांचे आणि वाणिज्य स्वरूपाचे सुमारे ४०५० चौरस फूटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले, हे अनधिकृत बांधकाम तीन पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आले.

ही कारवाई करताना पीएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, संबंधित अनधिकृत बांधकामधारकांकडून बांधकाम पडण्याच्या खर्च वसूल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, दरम्यान, पीएमआरडीए क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यापूर्वी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी असेही सांगितले, परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.