पुणे

नवरसाच्या नव कवितांनी गाजले संभाजी महाराज साहित्य संमेलन

उपसंपादक सुधीर मेथेकर

सासवड  : मनातल्या भावना शब्दांच्या चिमटीत पकडून काव्य रसाची शिंपण करीत कविनी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन गाजवले, नव रसाच्या नव कवितांना श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली,

जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय १४ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे झाले,
संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार मिळाला यात बार्शी शहराचे लोककवी मदन देगावकर यांना या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली तसेच सुप्रसिद्ध कवी कवियत्रीनी आप आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे प्रसिद्ध कवीच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन बहारदार अन् दमदार कवितांचे सादरीकरण झाले.

भावविश्वात हरवलेलं मन समाज व्यवस्था राजकारण प्रबोधन हास्याचे फवारे उडवणारे कवी देवेंद्र गावंडे यांची कविता अफलातून सादर करून टाळ्यांचा गजर झाला या कविसंमेलनात पुणे नाशिक नागोराव सोनकुसरे नागपूर सातारा मंगळवेढा योगेश हरणे पांडुरंग म्हस्के सोलापूर श्रीशैल सुतार विजय माने मुंबई रेखा काळे राजगुरुनगर पुजा माळी सुजाता शिंदे हर्षदा झगडे स्वाती बंगाळे बारामती शिवाजी कचरे यवत वाय के शेख विश्वास ताकवणे ,छाया पाटील, तानाजी जगताप,राजाभाऊ जगताप,कादंबरी नलावडे,महादेव रोकडे, पोपट वाबळे, प्रभाकर घाटगे,शरद काकडे, लता चव्हाण,दिलीप पाटोळे,यांनी कविता सादर केल्या, या कविसंमेलनात ज्येष्ठ लोककलावंत अमृता वनशिव पारगावकर यांस या वर्षीचा लोकनाट्य कलावंत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत ज्ञानोबा आकळे व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, संजय सोनवणे, दिपक पवार, विजय तुपे
यांच्या शुभहस्ते हस्ते गौरविण्यात आले.
या कविसंमेलनाचे बहारदार शैलीतून सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले व रसिकांची कवी कवियत्रीची मने जिकली, प्रा गंगाराम जाधव सर यांनी आभार मानले.