पुणेहडपसर

“रोखठोक महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलच्या विभागीय प्रतिनिधी पदी सतीश भिसे” हडपसर येथे कार्यक्रमात दिले नियुक्तीचे पत्र

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )
हडपसर पुणे रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन हडपसर भागात सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व सतीश शिवाजीराव भिसे यांची रोखठोक महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलच्या हडपसर विभागीय प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संपादक अनिल मोरे यांनी नुकतेच त्यांना दिले.

 

हडपसर व परिसरात सामाजिक व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सतीश भिसे यांची सामाजिक व राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आवड लक्षात घेता रोखठोक महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलच्या त्यांची हडपसर विभागीय प्रतिनिधी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी हडपसर व परिसरातील विविध क्षेत्रातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे असे प्रतिपादन संपादक अनिल मोरे यांनी केले.

 

याप्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर उपाध्यक्षा सविता मोरे, हरिभाऊ काळे, ह्यूमन राइट्स दिल्ली महाराष्ट्र अध्यक्षा अंजुला जैस्वाल, पुणे व्हाईस प्रिसीडेंट भारती रमेश तुपे, मनीषा शेवाळे, व्हाईस प्री्सीडेन्ट मनीषा शेवाळे, श्रीदेवी गांधी, मेघना प्रामाणिक, ऍड. मयुरा पाटील, आनंद गलांडे, चंद्रशेखर गलांडे, अमोल गलांडे, योगेश शिंदे, प्रमोद साळुंखे, दशरथ येवले, लक्ष्मी भोसेकर, प्रीती जैन, सपना म्हस्के, ज्योती पारख, रेखा साळवे, सुचित्रा डावकर, सुकन्या आढाव, जयहिंद मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वजीत तुपे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सतीश भिसे यांना हडपसर परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व विविध क्षेत्रातील अनुभव दांडगा असून त्यांचा जनसंपर्क पाहता ते समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील.
मारुती आबा तुपे

मा. नगरसेवक पुणे महापालिका