पुणेमहाराष्ट्र

Big Breking news :मी हिंदू धर्माला नष्ट करेन आणि नरेंद्र मोदींना मारून टाकेन’, Gmail च्या माध्यमातून धमकी…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पिटीआय रिपोर्टनुसार राज्यात हिंदुत्वसंबधी एक वेबसाईट चालवली जाते. आणि त्या साईडवरून हिंदू धर्माविषयी सर्व प्रकारची माहिती शेअर करून लोकांपर्यंत पोहचवली जाते. याच वेबसाईट वर कमेंट सेक्शन मध्ये एक धमकीची कमेंट देण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धमकीत मी भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत आहे. आतंकवादी संघटनांनाही आर्थिक स्वरूपाची मदत पुरवेन, आणि मी हिंदु धर्माला नष्ट करेन त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मारून टाकेन’, अशा आशयाची धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. या धमकीने आता एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीवरून आता पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.

 

नेमके काय प्रकरण आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हयातील दुधाने नामक व्यक्ती हिंदुत्वाशी संबंधित एक वेबसाईट चालवतात. 6 ऑगस्ट रोजी दुधाने आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्याला रूग्णालयात घेऊन जात होते. या दरम्यान आपली वेबसाईट तपासत असताना त्यांना एम ए मोखिम नावाच्या व्यक्तीची एक कमेंट सापडली. या कमेंटमध्ये देशाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली होती. “मी भारतात मोठा बाम्बस्फोट घडवण्याची योजना आखतोय, आतंकवादी संघटनांनाही पैसा पुरवत आहे. मी हिंदु धर्माला नष्ट करून टाकेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मारून टाकेन”, असा आशयाची धमकी एम ए मौखिमने दिली होती. हे प्रकरण फारच गंभीर असल्याचे लक्षात येताच दुधाने यांनी अलंकार पोलिस स्टेशन मध्ये फोन लावून पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी एम ए मौखिम याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.आय विल किल नरेंद्र मोदी, देशभरात बॉम्बस्फोट करणार, दीनानाथ रुग्णालयाला मेल मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने म्हटले आहे की, मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी बॉम्बब्लास्ट करण्याचा माझ्या हेतु आहे असे देखील त्याने म्हटले आहे. ज्याने हा मेसेज पाठवला आहे त्याचे नाव एम. ए. मोखीम असे असून त्याने जीमेलच्या माध्यमांतून धमकीचा मेसेज पाठवला आहे. ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी पुणे शहर पोलिस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती.

त्यांचा संभध हा आयसीसशी असल्याचे निष्पन्न झाले असून हे दहशतवादी पुण्यात आणि भारतात विविध ठिकाणी बॉम्बब्लास्ट करणार होते. याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी पुण्यात साताऱ्यात आणि कोल्हापूरच्या जंगलात केल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी पुण्यात तरुणांसाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित केले होते. हे प्रकरण आता एटीएस करून राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आहे. दरम्यान, आज मेल वरुन आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. या प्रकरणावर पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा म्हणाले की, वेबसाईटवर ही कमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध होती. ज्या आयपी ऍड्रेसवरून ही टिपण्णी करण्यात आली होती, ती भारताबाहेरची असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.