पुणे

साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 वीची परीक्षा सुरळीत सुरू.

हडपसर,वार्ताहर.

साधना विद्यालय व आर. आर . शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर मध्ये आज 12 वीच्या परीक्षेसाठी विज्ञान विभागातील 708 विद्यार्थांनी, 597 विद्यार्थी, त्यापैकी दिव्यांग 05 विद्यार्थी असे एकूण 1305 विद्यार्थी साधना केंद्रात प्रविष्ठ आहेत.या परीक्षार्थीना सर्व भौतिक सुविधा शालेय प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहेत.

शाळा प्रशासनाकडून परीक्षेचे उत्तम नियोजन प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,संस्थेचे आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

परीक्षेसाठी केंद्रसंचालक धनाजी सावंत, उपकेंद्रसंचालक नितीन महामुनी, गोकुळ टकले, मारुती शिंदे, हनुमंत ननवरे, पांडुरंग गाडेकर,विजय सोनवणे हे काम पाहत आहेत.