पुणे

पौड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, अमेरिकन महिलेचे ६ हजार डॉलर चोरणाऱ्या चोराच्या आवळल्या मुसक्या,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम 

पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आत्ममंथन मुळशी येथे आलेल्या अमेरिकन महिलेचे ६ हजार अमेरिकन डाॅलर चोरल्या प्रकरणी पोलीसांनी एकाला जेरबंद केला आहे. त्याच्या कडून सहा हजार अमेरिकन डाॅलर जप्त करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित महिलेला ते डाॅलर परत करण्यात आले आहेत. 

                             या संदर्भात सविस्तर माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली. ते म्हणाले या प्रकरणी आत्ममंथन मुळशी येथील सुरक्षा व्यवस्थापक भालचंद्र श्रीधर जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीनुसार तेथील एक कामगार विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई ( रा. मुंबई, टिटवाळा) याला अटक करण्यात आली आहे. 

                                  हि घटना २५ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली होती. भालचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे बीबी जमीना करीम ( रा. अमेरिका, न्यूयॉर्क, गयाना सिटी ) नावाचे एक पाहुणे आले होते. त्यांचे ५९४३ अमेरिकन डॉलर चोरीला गेले आहेत. पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन तपासपथक नेमुन सदर घटनेचा तपास करण्याच्या सुचना दिल्या. सदर ठिकाणी कामास असलेला विजयसिंग वीरेंद्रसिंग पटोई ह्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडी घेऊन ह्या घटनेचा तपास पूर्ण केला. ५९४३ अमेरिकेन डॉलर विजय पटोई ह्याच्या कडून हस्तगत करण्यात आले आहेत.

                              ८ मार्च रोजी न्यायालयाने बीबी जमीना करीम यांना सदरचे डॉलर परत देण्याचे आदेश दिले असुन त्यांना त्यांचे ५९४३ अमेरिकेन डॉलर परत करण्यात आले आहेत. हि कामगिरी अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटिल, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, संदीप चव्हाण, सहायक फौजदार संतोष कुंभार, हवालदार रॉकी देवकाते, हगवणे, नामदेव मोरे, दत्तात्रय अर्जुन, साहिल शेख, आकाश पाटील, अक्षय यादव यांनी सदर घटनेचा तपास करून आरोपीचा शोध लावून सदर आरोपीस पकडण्यास यश आले.