पुणे

जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य सम्राट पुणे संस्थेचे १६३ वे कविसंमेलन सारसबाग येथे संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य सम्राट पुणे संस्थेने १६३ वे कविसंमेलन सारस बाग पुणे येथे आयोजित केले होते. विचारपीठावर कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रकाशिका रूपालीताई अवचरे, प्रमुख अतिथी संपादिका अमिताताई कदम, जेष्ठ कवयित्री adv संध्या गोळे आणि साहित्य सम्राट संस्थेच्या सचिव अर्चनाताई अष्टुळ उपस्थित होत्या.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिला म्हणजे महान, हिम्मतवाली लाजवंती असते. तीने अनिष्ट, रूढी, परंपरा आणि पुरूषप्रधान संस्कृतीशी लढा देऊन आज ती सर्वच पदांवर आरूढ झाली आहे. म्हणून महिला अबला नसून सबला आहे. असे मत सौ.अष्टुळ यांनी प्रस्तावनेत विचार मांडले.

पत्रकार आणि कवी यांचा तसा संबंध नसतो आणि असतोही मला अष्टुळसरांमुळे त्यांच्या नित्य साहित्यिक कार्यक्रमामुळे साहित्यिक महिलांचे विश्व कळाले. यावेळी महाराष्ट्र २४ तास च्या कदम बोलत होत्या. शेवटी अध्यक्षीय भाषणांत अवचरे म्हणाल्या की महिलादिन हा महिला आणि पुरुष या दोघांनीही गौरव करण्याचा दिवस आहे. दोघांच्या प्रेम आणि विश्वासावरच आज दोघेही आनंदीजीवन उपभोगत असतो.

यावेळी मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि राजस्थानी भाषेतील विचार आणि रचना सादर झाल्या. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, शेतकरी, सुरक्षारक्षक, नाट्यकलावंत, कॉलेज तरुणी आणि गृहिणी अशा विविध क्षेत्रातील, जेष्ठ कनिष्ठ मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कविसंमेलनात राहुल भोसले, मसूद पटेल, सुर्यकांत नामुगडे, adv उमाकांत आदमाने, प्रा.अशोक शिंदे, रविंद्रकुमार भडाळे, रत्नमाला शिरवळकर, पुष्पा पवार, मिनाक्षी कांबळे, संगीता खोमणे, वर्षा टपळे, नितिन शिरवळकर, प्रीती खोपडे, मेघा करंजे, प्रा.आनंद महाजन, लक्ष्मीदेवी रेड्डी, adv नेहा ताकवले, adv वर्षा ताकवले, जनाबापू पुणेकर, चंद्रकांत जोगदंड, सीताराम नरके, तेजस्वी जाधव, वनमाला आष्टुरकर, अलका माळी, लता लडकत, सुनंदा कुलकर्णी, प्रियंका वाळुंजकर, सदाशिव जाधव सुरेश बारोटे, महेंद्र इंगळे, डॉ.श्री व सौ मिश्रा. विजय कांबळे आणि संगीता कांबळे इ. कवी कावयित्रींनी आपल्या विविध भाषेतील आणि ढंगातील काव्य रचनांनी काव्य रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन शरयू पवार यांनी केले तर किशोर टिळेकर यांनी आभार मानले.