पुणे

पुण्यातील मामासाहेब मोहळ तालमीत सराव करताना पै. स्वप्नील पाडाळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला मृत्यू…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

तालमीत सराव करताना पै. स्वप्नील पाडळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यातील मामासाहेब मोहळ तालमीत मृत्यू झाला, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात स्वप्नील सराव करीत होता, त्याने पुण्यात महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळविलेला होता, पै. स्वप्नील पाडाळे (वय ३१) हा तालमीमध्ये सराव करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांचे वय अवघे ३१ वर्ष होते.

एवढ्या कमी वयात मृत्यू झाल्याने कुस्ती क्षेत्रावरती शोककळा पसरली आहे, पाडाळे यांच्या मृत्यूने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे, पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात पैलवान स्वप्नील पाडाळे सराव करत होता, सकाळी ७.३० वाजता पुण्यातील मारुंजी इथल्या कुस्ती तालमीत ही दुर्दैवी घटना घडली, स्वप्निल हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता, कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्निल देखील व्यायाम करत होता, व्यायाम करताना स्वप्निल अचानक कोसळला तो पुन्हा उठलाच नाही, स्वप्निल अचानक खाली कोसळल्याचे पाहून तालमीतील इतर पैलवानांनी त्याला उचलले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

परंतु त्याआधीच स्वप्निल चा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचे निधन झाले असे सांगितले, प्रशिक्षणासाठी स्वप्निल ने एन आय एस पतीयाळा येथून विशेष अभ्यास पूर्ण केला होता, स्वप्निल चे आकस्मित निधन झाल्यामुळे अवघ्या कुस्ती क्षेत्रा वर शोककळा पसरली आहे.