पुणे

बहुचर्चित हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान, १८ जागांसाठी ५७ उमेदवार नशीब आजमावणार – मतदारांचा कौल धनशक्ती का जनशक्तीला?

पुणे (विशेष प्रतिनिधी)

हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान, १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात मतदार आज आपला कौल अजमवणार कोण मारणार बाजी ? राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत पॅनल की भाजप सर्वपक्षीय पॅनल पुणे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक लढवत असून खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल व सर्वपक्षीय भाजप मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल मध्ये होत आहे. मात्र अपक्षांनी देखील प्रचाराचा धुरळा उडविला असून मोठे आव्हान निर्माण केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात नव्हे तर आशिया खंडात सर्वात मोठी व श्रीमंत असणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल समोर भाजप सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने तगडे आव्हान उभे केलेले दिसत आहे. हवेली बाजार समितीची निवडणूक २० वर्षानंतर होत आहे यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११ संचालक निवडले जाणार असून या ११ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून चार उमेदवार निवडले जाणार आहे. ग्रामपंचायत मतदार संघात २ संचालक निवडले जाणार असून येथे ६ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात १ संचालक निवडला जाणार असून येथे ३ उमेदवार रिंगणात आहेत.

 

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघात १ संचालक निवडला जाणार असून येथे २ उमेदवार रिंगणात आहे. व्यापारी आडते मतदारसंघातून २ संचालक निवडले जाणार असून येथे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हमाली मापाडी मतदारसंघात १ संचालक निवडुन द्यायचा असून येथे ५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

 

व्यापारी आडते गटातून बाळासाहेब भिसे यांचे प्रस्तापितांपुढे आव्हान….

पुण्याच्या पूर्व भागात कष्टकऱ्यांसाठी लढा देणारे आक्रमक नेतृत्व बाळासाहेब भिसे व्यापारी आडते गटातून अपक्ष उमेदवार असून त्यांचे उमेदवारी चिन्ह कांदा आहे मात्र त्यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सर्वपक्षीय पाठिंबा त्यांच्या पथ्यावर पडला आहे एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून उमेदवार प्रचार करत असताना बाळासाहेबांसारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र त्यांची चांगलीच गोची केली आहे, एकंदरीत परिस्थिती पाहता अपक्ष उमेदवार भिसे यांनी प्रस्थापितांपुढे चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. मतदार या धनदांड्यांना धक्का देत बाळासाहेब भिसे सारख्या कार्यकर्त्यांस निवडून देतील असा विश्वास जाणकार व्यक्त करीत आहेत.