पुणेहडपसर

“मांजरी फार्म परिसरातील महिलेचा अज्ञाताने केलेल्या खुनाचा गुन्हा हडपसर पोलिसांकडून दोन दिवसात उघड”

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

हडपसर -दिनांक २४/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याचा सुमारास नियंत्रण कक्ष पुणे येथून झगडे वस्ती, कुरण फार्म महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत एका महिलेची बॉडी दिसून आली आहे. असा कॉल प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी विजय कुमार शिंदे सपोनि प्रताप शेळके, पोउपनिरी व अंमलदार असे घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी एका ५० वर्षीय महिलेची बाँडो ही विहरीमध्ये मिळून आली. मयताच्या डोक्यात अज्ञात इसमाने डोक्यात धारधार हत्याराने आणि कठीण हत्याराने घाव घालून तिचे प्रेत बिहरीत टाकले. अधिक माहीती घेता मयताचे नाव उषा अशोक देशमुख,( वय ५० वर्ष रा. माळवाडी, कवडीपाट, लोणी काळभोर पुणे )असे समजले सदर महिला शेळीपालन करीत होती. हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ६२३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे यांनी देखील भेट दिली होती व गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील १०० एकर जागेत निर्जन स्थळी खजीना बिहार मध्ये महिलची बॉडी मिळून आली. सदर महिलेस १०० ते १२५ फुट अंतरावरून मारून फरफटून ओढून विहीरीमध्ये टाकल्याचे दिसून येत होते. सीसीटीव्ही फुटेज वा इतर कोणताही उपयुक्त पुरावा घटनास्थळी नव्हता. घटनास्थळ ग्रामिण भागातील असल्याने हडपसर तपास पथकाने दोन दिवस झगडे वस्ती,कदम वाकवस्ती कवडीमाळवाडी, कवडीपाट, मांजरी बद्रुक, शेवाळवाडी भागात फिरून आरोपीविषयी माहीती घेण्याचा प्रयत्न केला. तपासपथकास कवडी माळवाडी मधिल एक व्यक्ती घटनाझाल्यापासून गायब असल्याची माहीती मिळाली.

अधिक माहीती घेता सदर व्यक्ती ४-५ दिवसापुर्वीच जेल मधून सुटला असल्याची माहीती मिळाली. तपासपथकातील अंमलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की, संशयित हा फुरसुंगी भागात एका बिहारी इसमाकडे पेंटींगचे कामाकरीता गेला आहे. त्याच्या वर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. मिळालेली माहीती व तांत्रिक विश्लेषण याचे आधारे आरोपी नामे राजेश अशोक मुळेकर रा. कवडीपाट माळवाडी, हनुमान मंदिराशेजारी, लोणीकाळभोर, ता.हवेली जि. पुणे. यास दिनांक २६/०४/२०२३ रोजी सायंकाळी हडपसर गाव, कॅनोल भाग जवळील पान शॉप येथून ताब्यात घेवून त्यास हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी राजेश मुळेकर याचेकडे तपास करता त्याने सांगीतले की, दिनांक २४/०४ / २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. सुमारास तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील जागेत असणारी खजाना बिहरीवर बसवलेली पाण्याची मोटार चोरण्यासाठी आला होता. मोटार चोरत असताना मयत महिला ही शेळ्या घेवून जात होती, तेंव्हा मयताने अरोपीस विहीरीवर मोटार चोरत असताना पाहीले आणि तुझ्याबाबत येथील अधिकारी यांना सांगते असे बोलून निघून जात होती. तेव्हा आपले नाव सगळ्यांना समजेन व पुन्हा जेल मध्ये जावे लागेल या विचाराने आरोपीने तेथे पडलेली सिमेंटची (विट) ब्लॉक तिच्या डोक्यात पाठीमागून मारली व जमिनीवर पडल्यावर मयताजवळील कोयत्याने डोक्यात वार केले आणी फरफटत आणून बिहरीत ढकलून दिले होते. सदर गुन्ह्याचा तपास, विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत. निर्जनस्थळी अज्ञात आरोपीने केलेल्या खुनामध्ये कोणताही पुरावा नसताना पोलीसांनी अतिशय कौशल्याने आणि अथक परिश्रम करून हडपसर तपासपथकाने महिलेच्या खुनाचा गुन्हा दोन दिवसात उघड केला.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार,  पोलीस आयुक्त सो पुणे शहर  संदिप कणिक,  सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर  रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व  विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली  बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,  अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर,  दिगंबर शिंदे सो, पोनि (गुन्हे)  विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.