पुणे

“ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना शिवसेनेचा दणका… महापालिकेच्या कर संकलन विभागातील ६० टक्के सेवकांच्या बदल्या त्वरित कराव्यात | शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी”

सामान्य प्रशासन विभागाकडून कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील किमान ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात व पुढील ३ महिन्यात उर्वरित २०% व पुढील ३ महिन्यात २०% अशा बदल्या करण्यात याव्यात. अशाच प्रकारे पुणे मनपा प्रशासानाकडील सर्व खात्यांमध्ये सर्वच पदांच्या बदल्या तातडीने करणेची कार्यवाही करावी. अशी मागणी शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे  केली आहे.

भानगिरे यांच्या निवेदनानुसार महानगरपालिकेतील लेखनिक संवर्गातील प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक व पदस्थापना बदली यांच्या दि.१७/०४/२०२३ रोजी नियतकालिक एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात २० % बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यामध्ये सन २०१५ मध्ये ज्या सेवकांची कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक यांची नेमणूक झाली आहे असे सेवक आजही कर आकारणी कडे कार्यरत आहेत व सन २०१६ अथवा त्यानंतर नेमणूक झालेल्या मोजक्या सेवकांच्या बदल्या झालेल्या दिसून येत आहेत.

 

सध्या कार्यरत सेवकांची बदली करताना अनुभवी सेवक पाहिजे अशी मागणी कर आकारणी कर संकलन खाते प्रमुखांकडून होत आहे. कर आकारणी कर संकलन प्रमुख यांचेकडे मालमत्ता व्यवस्थापन असे २ पदभार असून त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे असे वाटते. असे असल्यास त्यांना एकाच खात्याचा पदभार देण्यात यावा.

 

सन २००७ – २००८ या आर्थिक वर्षात कर आकारणी विभागातील वर्ग-३ मधील सर्व पदांच्या सेवकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी वर्ग-३ मधील नवीन सेवक घेऊन कर आकारणी खात्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले व उत्पन्नात वाढ होऊन यश आले होते, हि बाब लक्षात घ्यावी. सामान्य प्रशासन विभागाकडून कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील किमान ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात व पुढील ३ महिन्यात उर्वरित २०% व पुढील ३ महिन्यात २०% अशा बदल्या करण्यात याव्यात. अशाच प्रकारे पुणे मनपा प्रशासानाकडील सर्व खात्यांमध्ये सर्वच पदांच्या बदल्या तातडीने करणेची कार्यवाही करावी.

 

कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडील अधिक्षक हे प्र.प्रशासन अधिकारी म्हणून काम करीत आहेत. आमच्या माहितीनुसार ते सन १९९७ रोजी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून ते आजतागायत (सन २०१२ ते २०१५ अशी ३ वर्षे सोडून) कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडेच कार्यरत आहेत. हि बाब सामान्य प्रशासन विभागाच्या लक्षात का आली नाही. सदर बाब अतिरिक्त महा.आयुक्त (ज) यांच्या सहमतीने करण्यात आलेली आहे अशी चर्चा पुणे मनपा वर्तुळात होत आहे.  प्रकरणी तातडीने योग्य कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हास देण्यात यावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.