पुणे

पुणे: विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये – मुली बरोबर बोलू नको असे सांगितल्याच्या रागातून दुचाक्या दिल्या पेटवून…!

विमानतळ पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे, मुलीबरोबर बोलायचे नाही, तसेंच तिला त्रास देऊ नको, असे सांगितल्याने मुलाने ती रहात असलेल्या ठिकाणी पार्किंगमध्ये लावलेली मुलीच्या दुचाकीसह आणखी दोन दुचाकी पेटवून दिल्या.

याप्रकरणी लोहगावमधील एका युवतीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२३) दिली आहे, त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली) व त्याच्या सहकारी मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे, हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व आरोपी श्रीराम घाडगे हे एका कॉलेजमध्ये शिकत असल्याने तु माझ्याबरोबर बोलत जा , काही प्रॉब्लम असल्यास सांगत जा असे म्हणून श्रीराम त्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता,तसेंच माझ्यासोबर बोलत जा असे म्हणून सतत त्रास देत होता, मुली बरोबर या गोष्टी दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिने हे आपल्या वडिलांना सांगितले.

तेव्हा मुलीच्या वडिलांनी आरोपी श्रीराम याला प्रत्यक्ष भेटून सांगितले की माझ्या मुलीला तुझ्यासोबत बोलायला व भेटायला आवडत नाही, तिला उगाच त्रास देऊ नको, असे समजावून सांगितले, त्याचा राग मनात धरुन त्याने एक-दोन साथीदारांना बरोबर घेतले, आणी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला आग लावली, त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झाले आहे,पुढील तपास पोलीस हवालदार धेंडे तपास करीत आहेत.