पुणे

युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा नरेंद्र मोदींचा डाव अजित पवार यांची केंद्र सरकारवर टिका

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)

विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवल्या आता मात्र देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून निवडणूक जिकण्याच षडयंत्र भाजप सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी हडपसर येथे बोलताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने अमोल कोल्हे यांच्याशी संवाद अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन हडपसर येथे केले होते यावेळी अजित पवार बोलत होते.
यावेळी माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी सभापती संदीप तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, निलेश मगर नगरसेविका वैशाली बनकर, हेमलता मगर, पूजा कोद्रे, योगेश ससाणे, फारूक इनामदार, अशोक कांबळे, आनंद अलकुंटे, नंदा लोणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार यांनी पुढे बोलताना महिला सुरक्षा, शेतीमालाला भाव नाही, वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, दहशत, गुंडगिरी,
बेरोजगार, महागाई, जीएसटी यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगने मुश्किल झाले असून आता बदल करण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले वैद्यकीय, कला क्षेत्रात काम करत असताना शरद पवार यांना आदर्श मानून राजकारणात आलो आहे, तरुणांचा वाढता प्रतिसाद हा परिवर्तनासाठी असून त्यामुळं चौकाराचा दावा करणारे विद्यमान खासदारांच्या निष्क्रीयतेमुळे जनता आता त्यांच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही माझी जात ही शिवरायांचा मावळा असून जातीपातीचे राजकारण करू नये अशा शब्दांत आढळराव पाटील यांच्यावर टीका केली.
शिरूर मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागातील किती नागरी प्रश्न विद्यमान खासदार आढळराव यांनी सोडविले ? हा प्रश्न आता जनतेने त्यांना विचारला पाहिजे, संभाजी महाराज यांच्यावरील मालिका बंद करण्याचा कोणी प्रयत्न तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा त्यांनी दिला.
विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या जातीवरून विधान करून मनातून पराभव स्वीकारला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर मधील अनेक प्रश्न जे केंद्राच्या अखत्यारीत येतात ते प्रलंबित आहेत, बाकीच्या विधानसभा मतदारसंघातील एकही काम केळवे नसताना खासदार आढळराव 14 हजार कोटींची कामे केल्याचा हास्यास्पद दावा करतात याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी आघाडीच्या उमेदवारास हडपसर विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्य देणार असल्याचा दावा त्यांनी केला. या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने अजित पवार व डॉ.अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

 

0 0 votes
Article Rating
184 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments