पुणे

साधना विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.12 टक्के

हडपसर,वार्ताहर. हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
विद्यालयाचा एकूण निकाल 98.12 % लागला.90 % पेक्षा अधिक गुण 37 विद्यार्थ्यांनी मिळवले. विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.

विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक राऊत यश बाळासो 97.60 % ,द्वितीय क्रमांक शिर्के अथर्व संतोष 97.20 % ,तृतीय क्रमांक दराडे श्रेयश सिद्धेश्वर 97.00%

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन, आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे , अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार,
विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे व आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी सर्व विषयशिक्षक, व सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.