पुणे

अल्पवयीन मुलीवर बळजबरीने करत होता बलात्कार, उरुळी कांचन येथील तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर :अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित करुन अल्पवयीन मुलीला चार महिन्याची गरोदर ठेवणाऱ्या एका तरूणाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पास्को ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन सोनु ऊर्फ सिध्दराम ज्ञानेश्वर भालेराव (वय- २५, रा.बोरकर वस्ती, ऊरळी कांचन, ता. हवेली) याच्या विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
लोणीकाळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील पिडीत मुलीचे कुटूंब आहे. तिचे वडील मजुरी तर आई मिळेल त्या ठिकाणी धुनी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भालेराव याची सदर कुटुंबाशी ओळख असल्याने पिडीतेच्या घरी त्याचे येणेजाणे सुरु असते.
६ फेब्रुवारी रोजी पिडीतेने आईस माझ्या पोटात डाव्या बाजूला दुखत आहे असे सांगितले. म्हणून वडीलांनी तिला चिंचवड येथे नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने वरील सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्हाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौघुले या करत आहेत.