पुणे

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून युवतीची फसवणूक – जागरुक शिवसैनिकामुळे पीडित युवतीला मिळाला न्याय आरोपी गजाआड

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहून युवतीला गर्भवती करून फरार झालेल्या भामट्यास पोलिसांनी पकडून गजाआड केले प्रशांत जाधव आणि सुवर्णा कदम यांच्या तत्परतेमुळे एका पीडित युवती ला न्याय मिळाला.
युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स तर कौन्सिल भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुणजी बाकोलिया महीला राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुमन मौर्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सकपाळ आणि महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सुवर्णा कदम यांच्य सहकार्यातून एकापीडित महिलेस न्याय मिळून दिला. गेल्या महिन्यात शिवछत्रपती ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच नवीन पनवेल उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांना अहमदनगर वरून एक मुलीचा फोन आला आणि त्याचा बाबतीत जी फसवणूक झाली अन्याय झाला त्याबद्दल तिने प्रशांत जाधव यांना माहिती दिली सगळं प्रकरण समजून घेतल्या नंतर प्रशांत जाधव यांनी युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स कौन्सिल च्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा कदम यांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर संबंधित पीडित मुलीशी चर्चा करून आम्ही पुढील कारवाईस सुरुवात केली संबंधित मुलगी ही ही पुण्यामध्ये नोकरी करीत होती आणि आरोपी आकाश राजपूत याने या मुलीवर पाळत ठेऊन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ते दोघे जुनं 2019 पासून लिव्ह इन् रिलेशन शीपमध्ये 31/12/2021 पर्यंत राहत होते त्यावेळी आरोपीआकाश राजपुतने सांगितले होते की मी अविवाहित आहे परंतु मला नोकरी व्यवसाय काहीच नाही तरीसुद्धा त्या मुलीने समजून घेऊन त्यांच्याशी व्यवस्थित राहिली पण जेंव्हा डिसेंबर 2021. ला मुलीने स्वतः गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा मात्र त्याची भाषा बदलली आणि फोन उचलण्यास टाळाटाळ करू लागला नंतर सांगितले की माझे लग्न झाले आहे या प्रकारे सांगून बोलणे भेटणे बंद केले फोन बंद केला तसेच त्याच्या नातेवाईकांकडून धमक्या येऊ लागल्या आणि सदर व्यक्ती आम्ही कारवाई करणार हे समल्यावर रात्रीत रूम खाली करून पळून गेला, नंतर प्रशांत जाधव आणि प्रदेशाध्यक्ष सुवर्णा कदम यांनी सदर मुलीस मेडिकल करून दूरध्वनीद्वारे हिंजवडी पोलीस स्टेशन आणि सांगवी पोलिस स्टेनला संपर्क साधला आणि पीडित मुलीस न्याय देण्यासाठी सतत पाठपुरावा केला त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आरोपी आकाश शाम राजपूत ला अटक करण्यात आली, प्रशांत जाधव आणि सुवर्णा कदम यांच्या तत्परतेमुळे एका पीडित युवती ला न्याय मिळाला.