पुणे

Pune : कोंढव्यातील जागा बळकावण्याचा प्रयत्न, 25 ते 30 जणांविरूध्द FIR

पुणे : ऑनलाइन – वडिलोपार्जित जागेत बेकायदेशीर प्रवेश करत जागा बळकावण्याच्या प्रयत्न करत 10 लाखांचे नुकसान केले. तर सीसीटीव्ही चोरत डेव्हलपमेंट सुपरवायझरला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे घडला आहे.

याप्रकरणी सुरेशकुमार बोलाद्रा (वय 44) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल तयब कुरेशी बहरीणवाला याच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी हा सर्व प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कोंढवा बुद्रुक येथे सर्व्हे नं. 52/7ब/2 येथे वडिलोपार्जित 20 गुंठे जागा आहे. याठिकाणी काम सुरू आहे. मात्र आरोपीनी संगनमत करून याठिकाणी बेकायदेशीर प्रवेश केला. तसेच तोडफोड करत 10 लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. तसेच डेव्हलपमेंट सुपरवायझरला शिवीगाळ व दमदाटी करत अतिक्रमण केले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x