पुणे

Pune : शहरात साखळी चोर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह, कोंढवा आणि विश्रांतवाडीमध्ये महिलांकडील दागिने लांबविले

पुणे : ऑनलाइन – शहरात शांत झालेले सोन साखळी चोरटे पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून, काल दोन ठिकाणी सोन साखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात दीड लाख रुपयांचा दागिने चोरून नेले आहेत. कोंढवा आणि विश्रांतवाडी या परिसरात या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. आळंदी रस्त्यावर भल्या सकाळी मुलीसोबत दुचाकीवर आलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या आईला दुचाकीवर घेऊज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास भाजी मार्केट येथे आल्या होत्या. भाजी घेऊन त्या परत दुचाकीवर आळंदी रोडने घरी जात होत्या. यावेळी बिस्मिला चिकन सेंटरच्या समोर आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. त्यांनी आरडाओरडा केला. पण सोन साखळी चोरटा कळस गावच्या दिशेने पसार झाला. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याचा शोध घेतला. पण पोलिसांना चोरटा सापडला नाही. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

तसेच दुसरी घटना कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या तालाब मज्जीद समोरील रोडने क्रॉस करत होत्या. यामुळे समोरील रोडने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळ येत गळ्यातील 90 हजार रुपयांची सोन साखळी जबदस्तीने तोडून नेली. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. ऑन चोरटे पसार झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करत चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x