पुणेहडपसर

हडपसर पोलिसांचे कारवाईचे सत्र सुरूच वाहन चोरीचे १० गुन्हे उघड करून ७,३०,०००/ किमतीचा मुद्देमाल जप्त, वर्षभरात २३,५०,०००/ किमतीची वाहन चोरी उघड,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

हडपसर  पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी आठवडा मिटींग (WRM) मध्ये पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच विक्रांत देशमुख सर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे व अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला. त्याप्रमाणे दिनांक ०६/०४/२०२३ रोजी १४ वाहनचोरीचे गुन्हे हडपसर पोलीसांनी उघड केले होते.

तयार केलेल्या आराखड्यानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सपोनि अविनाश शिंदे, पोउपनिरी, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अजित मदने, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड, असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना २ इसम संशयीत रित्या दुचाकी सह मिळून आले. नमुद इसमाकडे गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा करता त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस ठान्यास आणून त्यांच्याकडे चौकशी केली असताआरोपी नागे १) दत्ता शिवाजी दहिफळे( वय १८ वर्षे राहणार सध्या भेकराईशाळेच्या बाजूला, उमाळवाडी, )भाऊसाहेब उमाळ यांच्याकडे भाड्याने, (भेकराईनगर, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. मारुतीची पांगरी, ता. पाटोदा, जि. बीड) व २) चाबुराव धर्मराज तोंडे (वय १८ वर्ष, राहणार- मु.पो. आंबेगाव, ता. किल्ले धारूर, जि. बीड )याने पुणे शहर, बिड या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरो केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नामे १) दत्ता शिवाजी दहिफळे (वय १८ वर्ष राहणार सध्या भेकराईशाळेच्या बाजूला, ढमाळवाडी, भाऊसाहेब ढगाळ यांचेकडे भाड्याने, भेकराईनगर, हडपसर पुणे )मुळे राहणार मु.पो. मारुतीची पांगरी, ता. पाटोदा, जि. बीड व २) बाबुराव धर्मराज तोडे (वय १८ वर्षे राहणार- मु.पो. आंबेगाव ता किल्ले धारूर, जि. बीड)यांना पुणे शहर बिट हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५६९/२०२३ भा.दं.वि. कलम २७९,३४ चा गुन्ह्यात अटक करून एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दाखल गुन्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार समीर पांडुळे हे करीत आहेत. आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकूण ०८ गुन्हे उघडकीस झाले असून किं. ७,३०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये २ बुलेट, ०२ टिव्हीएस बाईक ०२ सीडी डिलक्स, ०१ स्प्लेन्डर, ०१ बजाज डिसकव्हर, ०१ बजाज टि-२०आणि ०१ यामाहा अशा १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे. हडपसर पो.स्टे ०५, बिड जिल्ह्यातील ०३ गुन्हे असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरित दोन गाडी मालकांचा शोध सुरू आहे.

हडपसर पोलीसांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या कारवाईमध्ये २७ दुचाकी व १ चारचाकी चोरीचे गुन्हे उघड
करून २३,५०,०००/- किमतीचा चा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही  रितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर संदिप कणिक, सह पोलीस आयुका सो पुणे शहर  रज्जनकुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख साो. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली  बजरंग देसाई सा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,  अरविंद गोकुळ सौ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे साो. पोनि (गुन्हे) विश्वास डगळे सो पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पाडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे ,अतुल पंधरकर, भगवान बडे, अनिरुद्ध सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर,चंद्रकांत रेलवाड या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.