पुणेमहाराष्ट्र

ईरण्णा चंद्रकांत सावळगी यांचा लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान

फुरसुंगी ः राज्यातील विभागीय सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ईरण्णा चंद्रकांत सावळगी हे बहुमताने विजयी झाल्याबद्दल लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ मंदिर तुकाई दर्शन येथे करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना राजाभाऊ होले म्हणाले,ईरण्णा सावळगी यांनी बी.एच.आर. मल्टीस्टेट पतसंस्था, शिवाजीराव भोसले बँक, सेवा विकास बँक, गणेश पतसंस्था सह अनेक संस्थांमधील आर्थिक गैरव्यवहार व अपहार उघडकीस आणण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. सहकार खात्यातील प्रशासन व लेखापरीक्षण विभागात एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. म्हणूनच सभासदांनी त्यांना या पदावर तिसर्यांदा निवडून दिले.

 

प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर म्हणाले सहकारा मुळेच आपल्या समाजाचा व देशाच्या विकास झालेला आहे. सावळगी सारख्या तरुणांनी या क्षेत्रात आपले योगदान देऊन विकासात्मक कार्य केले आहे. लोककल्याण प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष दिलीप भामे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी सिरम इन्स्टीट्युटचे कामगार प्रतिनिधी सचिन गायकवाड,प्रा.एस टी.पवार,आर्किटेक्ट विजय झगडे,स्वामी समर्थ मंदिराचे व्यवस्थापन समितीचे अविनाश गोडसे,प्रविण होले,भुषण चव्हाण शैलेश काळभोर मोरेश्वर कुलकर्णी,पांडुरंग शेंडे,राजाराम गायकवाड,श्यामकांत पाटील,धीरज गायकवाड,सलीम मुलाणी आदिंसह बहुसंख्य स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित होते.