मंबई शहरमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारणात होणार मोठा भूकंप,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

मुंबई :महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. असे असताना आता भाजपच्या एक मोठ्या नेत्या, एक वजनदार नेत्या पंकजा मुंडे यांना एक मोठी ऑफर बी. आर. एस. कडून देण्यात आली आहे.ती ऑफर आहे मुख्यमंत्री पदाची. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बी. आर. एस. ने लक्ष केंद्रित केले असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी मोठ्या पदांच्या ऑफर दिल्या आहेत.

आता बीआरएसने भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.त्यामुळे सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे. बीआरएसचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप यांनी पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. तसेच पंकजा बीआरएसमध्ये आल्यास त्यांची मुख्यमंत्री पदी बसण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल का? असे विचारता त्यावर सानप यांनी नक्कीच त्यांना न्याय मिळेल, असे सांगितले. यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. मी महारष्ट्रातील सर्व नेत्यांबरोबर या विषयांवर चर्चा करू असे सांगितले आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजा मुंडे यांना बीआरएसमध्ये शंभर टक्के न्याय मिळेल असे ते म्हणाले. दरम्यान, आषाढी वारीचे औचित्य साधून मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या नेतृत्वात 27 जून रोजी तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार आहेत. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे असे जानकरांचे मत आहे.