गडचिरोलीमहाराष्ट्र

मा.भुपेंद्रजी यादव केंद्रीय मंत्री यांचे प्रथमतः गडचिरोली येथे आगमना निमित्याने खासदार अशोकजी नेते यांनी जल्लोषात स्वागत केले.

दिं.२३ जून.
गडचिरोली:-माननीय भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री पर्यावरण,वन, एवं जलवायु परिवर्तन भारत सरकार यांचे गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या ग्राम सभा संवाद कार्यक्रमाला भुपेंद्रजी यादव केंद्रीय मंत्री यांचे प्रथमतः गडचिरोली येथे आगमना निमित्याने खासदार अशोकजी नेते यांनी जल्लोषात स्वागत केले.

याप्रसंगी @ मोदी ९ जनसंपर्क अभियान अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या बाईक रॅलीचा शुभारंभ कॉम्प्लेक्स एरिया कोर्ट या चौकातील माननीय मंत्री महोदय भूपेंद्र जी यादव व खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चानी भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो,एकच चर्चा युवा मोर्चा असे नारे देत आनंदाने बाईक रॅली संपन्न झाली. यावेळी गडचिरोची चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,मुकतेश्वर काटवे, केशव निंबोळ,विनोद देओ़जवार, हर्षल गेडाम आशिष कोडाप, संजय मांडवगडे, दीपक सातपुते, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी युवा मोर्चाचे उपस्थित होते.