पुणेमहाराष्ट्र

भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट नाही! संभाजी भिडे यांचे पुन्हा,एकदा वादग्रस्त विधान …!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे आणि त्या विधानामुळे वाद फार मोठ्या प्रमाणात चिघळण्याची शक्यता आहे. त्यांनी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी देशाची फाळणी झाली होती, असे वक्तव्य करून नवीनच शोध लावल्याचे बोलले जात आहे.

15 ऑगस्ट ला काळा दिवस म्हटले पाहिजे असेही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही.असेही विधान केले आहे. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिलेले होतेअसे त्यांचे मत आहे .

15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली. यादिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा असेही भिडे म्हणाले. यामुळे नवीन वादाची याची चर्चा जोरात सुरू आहे.

तसेच जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असेही ते म्हणाले.

तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीविषयीही आक्षेपार्ह विधानही संभाजी भिडे यांनी केलं आहे. यामुळे या नवीन वादाविषयीं चर्चेला उधाण आल्याचे बोलले जात आहे.