पुणे

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला…! – युवकांच्या प्रसंगावधामुळे दुर्घटना टळली..

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे 

दि. 27 महाराष्ट्र राज्यात तसेच भारताताही महिला महिला सुरक्षित नसल्याचे  चित्र पुन्हा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये तरूणीवर एकतर्फी प्रेमातून तब्बल 40  वार करून खून केल्याची घटना घडली होती. तर आत्ताची ताजी घटना म्हणजे पुण्यात लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात आली होती. एवढे होऊन सुद्धा महिलांच्या सुरक्षेसंदर्भात शासन कडक पावले का उचलत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.

आज पुन्हा पुण्यात एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेसारख्या अतिशय शांत आणि उच्चभ्रू असणाऱ्या ठिकाणी एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ला करणाऱ्या तरुणाला दोन तरूणांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. हॉटेल समोर ती त्याला बोलत असताना तिथे शंतनू जाधव नामक तरुण आला आणि त्याने आपल्या बॅगमधुन कोयता काढत कुणाला काही समजायच्या आतच त्या तरुणीवर वार करायला सुरुवात केली. त्यावेळी घाबरून तरुणीने तिथून पळ काढला. तरीही शंतनूने तरुणीचा पाठलाग सुरु केला. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतन जाधव याच्या हातातील कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चांगलाच चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

 

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तात्काळ आले व हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं. लेशपाल जवळगे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. आज जर तो मुलगा नसता तर माझी मुलगी वाचली नसती, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली. या हल्ल्याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी करत आहेत.