पुणे

बिग ब्रेकिंग … विधानसभेला राष्ट्रवादीचा प्रचार केला म्हणून शिवप्रेमी ला फोडला डोक्याला 17 टाके, हात मोडला, अज्ञात हल्लेखोर

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन ) – 
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान, जवळपास सर्वच मतदार संघात विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामध्येच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार केला म्हणून 20 ते 23 समाजकंटकांनी एका तरुण शिवप्रेमीवर खुनी हल्ला केला आहे. ही घटना आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सुमित बाबर (37, रा. कोंढवा खुर्द) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या ‘शिवप्रेमी’चे नाव आहे. सुमित बाबर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांचा प्रचार केला या कारणावरून समाजकंटांकडून त्यांच्यावर काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये सुमित यांच्या डोक्यात 17 टाके पडले आहेत तर हाथ मोडला आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. दरम्यान, सुमित हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे अनुयायी आहेत.
सुमित बाबर यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करणाऱ्या व भाजप विरोधी पोस्ट टाकल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झालेला असल्याची चर्चा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांनी भेट घेऊन विचारपूस केली, हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x