पुणे

“धक्कादायक :- तीन हजारासाठी पतीनेच पत्नीला लावले वेश्याव्यवसायास – पुण्यातील हडपसर मधील घटना”

पुण्यातील हडपसर परिसरात पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऐवढेच नव्हे तर केवळ तीन हजार रुपयांसाठी नराधम पतीने पत्नीला आपल्या दोन मित्रांच्या हवाली केले होते. याप्रकरणी पतीसह त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

एका २५ वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ) आणि सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पैशाच्या हव्यासापोटी पत्नीला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आपल्या दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. डिसेंबर २०२० पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.

काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मित्रांना अटक केली आहे.