पुणेमहाराष्ट्र

शिवराज राक्षे ला आसमान दाखवत सिंकदर शेख ठरला यावर्षीचा महाराष्ट्र केसरी…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे :2023 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही आळंदी जवळील फुलगावच्या सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत पार पडली.आज  66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत पार पडली.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या 22 सेकंदात प्रतिस्पर्धी शिवराज राक्षे ला झोळी डाव टाकत चितपट केले. आणि 66 व्या महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा झाली. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते.

त्यामुळे शिवराजचा सिकंदरपुढे निभाव लागला नाही. शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण पार पडले. पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.