पुणेमहाराष्ट्र

प्रसिध्द सराफ व्यावसायिकावर पुण्यात गोळीबार, लाखो करोडोचं सोन लुटलं…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यामधील एका प्रसिध्द सराफ व्यावसायिक ( प्रतीक ओसवाल ) यांच्यावर ऐन दिवाळीच्या तोंडावर गोळीबार करून लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पुणे शहरातील वानवडी भागातील बी.टी वकडे रोडवर ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर व्यावसायिकाकडील लाखो करोडोचं सोनं लुटून नेल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक मदनलाल ओसवाल असे असे गोळीबारात जखमी झालेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आल्यामुळे त्यांना काही समजायच्या आत हल्लेखोरांनी सोने घेऊन पोबारा केला. गोळीबारात व्यावसायिक गंभीर जखमी झाला. प्रतिक वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता तेव्हा ही घटना घडली. दुचाकीवरून पुण्यातील क्रोम मॉल चौकापासून बी.टी कवडे रोड कडे जात असताना रस्त्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना बुधवारच्या रात्री 9 वाजता घडली. दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी गोळी झाडली. घटनेत प्रतिकला तोंडावर आणि मांडीत गोळी लागली आणि तो जखमी झाला.

गोळीबाराच्या आवाजाने रस्त्यावर मोठा गोंधळ पसरला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी तपास सुरु केला. तसेच जखमी प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा गोळीबार कोणी केला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटली नाही. प्रतिक दुकानातील सोनं घेऊन निघाल होता. प्रथमदर्शींनी सांगितल्या प्रमाणे प्रतिककडे असलेले लाखो करोडोचे सोनं हल्लेखोर घेऊन फरार झाले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.