पुणेहडपसर

साधना कन्या विद्यालयात संविधानदिन साजरा

पुणे, दि. 27 ः रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये संविधानदिनानिमित्त संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सुजाता कालेकर यांच्या हस्ते संविधान आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, संस्थेचे आजीव सदस्य लालासाहेब खलाटे, पर्यवेक्षक नितीन सोनवणे, रेखा इंगळे उपस्थित होते.

 

कालेकर म्हणाल्या की, भारतीय नागरिक म्हणून संविधानाचे संस्कार मिळून एक चांगला नागरिक घडला पाहिजे. विद्यार्थिनींनी प्रभातफेरी काढून संविधानाविषयी जागृती केली. नागरिकांनीही संविधान वाचनामध्ये सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संस्थेचे आजीव सदस्य लालासाहेब खलाटे आणि उपशिक्षक भाऊराव रोंगटे यांनी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य यांची माहिती दिली.