पुणेमहाराष्ट्र

गायकवाडांना राज्यस्तरीय भीमरत्न गौरव पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 27 ः जेजुरी (ता. पुरंदर) येथील भीमरत्न विचार मंचच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून युवा कार्यकर्ते सूरज गायकवाड यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सगर यांच्या हस्ते राज्यस्तरीय भीमरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, संविधानाची प्रत, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. जेजुरी येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पंढरीनाथ जाधव, गौतम भालेराव, राहुल कांबळे, विष्णू भोसले आदी उपस्थित होते.

 

सगर म्हणाले की, गायकवाड यांचे मागिल 15 वर्षांपासून समाजासाठी नेटाने काम सुरू आहे. त्यांनी पुणे महापालिकेच्या घनकचरा प्रश्नावर शेतकऱ्यांच्यासाठी मोठे अंदोलन उभे केले, उपनगरानगरतच्या समाविष्ट गावातील पाणीटंचाई प्रश्नी मोठा आवाज उठविला. समाजातील अनेक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे. समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्यांसाठी सामाजिक संस्थांनी पुरस्काररूपी कौतुकाची थाप दिल्याने त्यांना काम करण्याचे मोठे बळ मिळते, असे त्यांनी सांगितले.