पुणेमहाराष्ट्र

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेला कुटुंबासह बंदुकीने जीवे मारण्याची धमकी; चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिलेला माझ्यासोबत अनैतिक संबंध ठेव नाहीतर तुला व तूझ्या कुटुंबाला जीवे मारीन अशी धमकी देण्यात आली. सदरील महिलेने नकार दिल्याने चंद्रकांत गाडे नामक व्यक्तीने महिलेशी अश्लील वर्तन केले आणि तिला बंदुकीचा धाक दाखवून तुझ्यासह तुझ्या कुटूंबातील सर्वांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

सदरील धक्कादायक घटना बाणेर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून एकावर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत अनंत गाडे, असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. गाडेवर विनयभंग, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि गाडे ओळखीचे आहेत.

महिला बाणेर रोड परिसरातील एका उपाहारृहाजवळून जात असताना गाडेने तिला आडवले.तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करुन अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र महिलेने त्याला नकार दिला. तेव्हा गाडेने चिडून कारमधून बंदुक बाहेर काढली. आणि पीडित महिलेला दाखवत धमकी दिली. तुझ्यासह तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारीन, अशी धमकी गाडेने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.