पुणेमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत ओझर गटाला विजेतपद तर आकुर्डीला उपविजेतेपद पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवात खेळाडू, क्रीडाप्रेमींची मांदियाळी

पुणे दि. 13 – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने घेतलेल्या जिल्हास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धेत ओझर गटाने विजेतेपद तर आकुर्डी गटाने उपविजेतपद पटकाविले. सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात दोन दिवस झालेल्या महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाखांतील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची मांदीयाळी भरली होती.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी मानद सचिव अड.संदीप कदम, उपसचिव एल.एम.पवार, खजिनदार अड.मोहन खजिनदार, प्राचार्य डॉ.पंडीत शेळके, फार्मसीच्या प्राचार्या डॉ.राजश्री चव्हाण तसेच सर्व शाखाप्रमुख, क्रिडाशिक्षक उपस्थित होते. यावेळी अड.कदम यांनी सांगितले की खेळात कुणाची तरी हार जीत होतच असते. परंतू खेळात घेतलेल्या सहभागाने शारिरीक आणि मानसिक सुदृढता वाढते. यामुळे विद्यार्थ्यांना करीअरच्या विविध संधीही उपलब्ध होतात.

या स्पर्धेतील वयोगटनिहाय विविध खेळांतील मुले आणि मुली विजेत्या, उपविजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –

14 वर्षे वयोगट – धावणे – 100 मीटर – संकेत कांबळे (चांदखेड), शिवम कुंभार (घोटावडे) मुली – तऩुजा शिंदे (शिंद), आदिती आदलिंग (निमगाव केतकी). 200 मीटर – साहील राऊत (निमगाव केतकी), आयान शेख (वाणेवाडी) मुली – ऋतुजा शिंदे (शिंद), तन्वी दुधाणे (शिंद). 400 मीटर – मयुर कोकरे (उरळगाव), शुभम श्रीराम (न्हावरे), मुली – ज्ञानेश्वरी शिंदे (पारगाव), कल्याणी आदलिंग (निमगाव केतकी). 600 मीटर – गोकुळ पवार (ओझर), नितेश यादव (येणेरे), मुली – श्रावणी जगताप (मांडकी), वृषाली मधे (येणेरे). लांबऊडी – संकेत कांबळे (चांदखेड), मोहीत भामे (मावडी क.प.) मुली – श्रावणी जगताप (मांडकी), शर्वरी माने (डाळज). रिले –आकुर्डी, उरळगाव, मुली – शिंद, मांडकी. व्हॉलिबॉल –ओझर, चऱ्होली, मुली – ओझर, चऱ्होली. कबड्डी –चऱ्होली, वेल्हे, मुली – संविदणे, मांडकी. खो – खो –निमगाव केतकी, शिंद, मुली – मावडी क.प., शिंद

17 वर्ष मुले – धावणे – 100 मीटर – तुषार भोंग (निमगाव केतकी), यश मोरे (सासवड) मुली – आर्या ढेकणे (नसरापूर), सुप्रिया दिघे (उरळगाव). 200 मीटर – आर्यन जागडे (पानशेत), रोहीत आनंदपुरे (पानशेत), मुली – संस्कृती वाघमारे (आकुर्डी), नम्रता क्षिरसागर (निमगाव केतकी). 400 मीटर – यश मोरे (सासवड), संतोष ठोंबरे (सासवड), मुली – सुप्रिया दिघे (उरळगाव), सिद्धी शेंडे (निमगाव केतकी) . 800 मीटर – अथर्व भुरूक (वेल्हे), महेश चौधरी (आकुर्डी) मुली – रूबीदेवी सोनकर (खराडी), प्रतिक्षा कचरे (निमगाव केतकी). 1500 मीटर – अमोल गरजे (उंब्रज) यश मोरे (सासवड) मुली – स्नेहल चव्हाण (मांडकी), विद्या कचरे (निमगाव केतकी). लांब उडी – विघ्नेश दांगट (उंब्रज), आयर्न जागडे (खामगाव), मुली – आर्या ढेकाणे (नसरापूर), संस्कृती वाल्हेकर (नसरापूर). गोळा फेक – तन्मय वेताळ (मांडकी), मयुर मिरेकर (मुंढवा) मुली – वेदीका तायकोडी (शिरोली), भाग्यश्री खारतोडे (डाळज). रिले – निमगाव केतकी, वाघोली मुली – उरळगाव, नसरापूर. व्हॉलीबॉल – ओझऱ, पौड, मुली – ओझर, मांडकी. कबड्डी – चऱ्होली, नसरापूर, मुली – शेलपिंपळगाव, नसरापूर. खो – खो – निमगाव केतकी, शिंद, मुली – निमगाव केतकी, मावडी क.प.

19 वर्षे मुले – धावणे – 100 मीटर – शुभम शिंदे (काटी), कृष्णा पवार (नसरापूर), मुली – अंकिता इंगुळकर (नसरापूर), निकीता जाधव (आकुर्डी). 200 मीटर – यश जाधव (सासवड), तेजस शेडगे (नसरापूर), मुली – अंकिता इंगुळकर (नसरापूर), निकीता जाधव (आकुर्डी). 400 मीटर – वैभव इसगुडे (सासवड), रोहीत गुंजाळ (ओतुर), मुली – अंकिता इंगुळकर (नसरापूर), निकीता जाधव (आकुर्डी). 800 मीटर – यश जाधव (सासवड), शुभम पाबळे (ओतुर), मुली – प्रियांका घुमरे (ओतुर), सृष्टी पाखरे (मुंढवा). 1500 मीटर – निषांत धुमाळ (सासवड), सूरज ठोंबरे (सासवड), मुली – प्रियांका घुमरे (ओतुर),, साक्षी किनाळे (मांडकी). लांब उडी – तेजस शेंडगे (नसरापूर), निखील सोनवणे (न्हावरे) मुली – ऋतुजा खेंगरे (मांडकी), निकीता टोणपे (न्हावरे), गोळा फेक – संस्कार भोंडवे (सुपे), मनोज काळे (नसरापूर), मुली – ज्ञानेश्वरी गुणवरे (खडकी), अनन्या आव्हाड (सांगवी). थाळी फेक – अथर्व गायकवाड (नसरापूर), यश इसामे (शिरोली), मुली – सोनाली चव्हाण, सिद्धी लावर (डाळज). रिले – सासवड, ओतुर, मुली – नसरापूर, हडपसर. व्हॉलीबॉल – चऱ्होली, ओझर, मुली – ओझर, हडपसर. कबड्डी –न्हावरे, वेल्हे, मुली – पिरंगुट, आकुर्डी. खो – खो –सासवड, सूपे, मुली – सूपे, वेल्हे

संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अड.संदीप कदम, खजिनदार अड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडीत शेळके, फार्मसीच्या प्राचार्या राजश्री चव्हाण तसेच सासवड महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सहकारी यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, संस्थेतील कर्मचारी यांनी विशेष सहभाग घेतला होता.