पुणेमहाराष्ट्र

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात विद्यार्थी, पालक व सेवकांसाठी मोफत दवाखाना

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आरोग्य विभाग व हडपसर येथील सानप हॉस्पिटल यांच्यामध्ये पंचवार्षिक करार झाला. विद्यार्थी पालक व सेवकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा असून, या करारानुसार महाविद्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सकाळी १० ते १२ वा वेळेत सानप हॉस्पिटल मधील तज्ञ् डॉक्टर्स येऊन गरजू विदयार्थी, पालक व सेवक यांची मोफत तपासणी करणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिली. ही मोफत सुविधा देण्यासाठी सानप हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिन सानप, जनरल फिजिशियन डॉ. संजय माने, बालरोग डॉ. अपर्णा केकाण, जनरल सर्जन डॉ. विशाल वायाळ व इतर तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत असे आरोग्य विभागाचे समन्वयक डॉ. शरद गिरमकर यांनी सांगितले.

 

या प्रसंगी करारास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, नॅकचे समन्वयक डॉ. रमाकांत जोशी, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. लतेश निकम, डॉ. रविंद्र मेने, सर्व नॅक क्रायटेरिया प्रमुख तसेच प्राणिशात्र विभातील डॉ. अंजु मुंढे, डॉ. महेश जोशी, नारायण खोमणे आदी उपस्थित होते.