पुणेमहाराष्ट्र

पुर्व हवेली येथील लोणी काळभोर अप्पर तहसिलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती

प्रतिनिधि -स्वप्नील कदम

लोणी काळभोर -हवेली तहसीलदार कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पुर्व हवेलीतील लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या कोलते या प्रथम तहसीलदार आहेत.

महाराष्ट्र शासनाने हवेली तालुक्याचे तहसील कार्यालयाचे विभाजन करून २ नोव्हेंबर २०२३ रोजी लोणी काळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे बाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे.

शासन निर्णय आणि अप्पर तहसीलदार व महसूल सहाय्यक पद निर्माण केले तसेच शासन राजपत्र सुद्धा ६ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले यानंतर ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने उपसचिव अजित देशमुख यांनी कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश पारीत केले. त्यानुसार, तृप्ती कोलते यांची निवड करण्यात आली आहे.