पुणेमहाराष्ट्र

रेखाकला परीक्षेत रणलाल शहा विद्यालयाची उत्तुंग भरारी- कविता बडेकर

पुणे, दि. ८ ः इंटरमिजिएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत
रमणलाल शहा माध्यमिक व प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाने
सलग ११ व्या १०० टक्के यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे, असे मुख्याध्यापिका कविता बडेकर यांनी सांगितले.

फुरसुंगी (आदर्शनगर) येथील नवचैतन्य मित्र मंडळ संचलित रमणलाल शहा माध्यमिक व प्रज्ञा प्राथमिक विद्यालयातील शासकिय रेखाकला परीक्षा २०२२-२३ इंटरमिजिएट ग्रेड-५४ व एलिमेंटरी-३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
बडेकर म्हणाल्या की, मागिल अकरा वर्षांपासून १०० टक्के यशस्वी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. सुहास गवळी, शहादेव उदमले,कैलास जाधव, रविंद्र देशपांडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. नवचैतन्य मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक सुरवसे, मुख्याध्यापिका कविता बडेकर, मुख्याध्यापिका सुवर्णा ससाणे आणि पालक-शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.