पुणे

मराठा टायगर फोर्स करणार राजस्थानमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी – संदीप लहाने पाटील

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे या उद्देशाने या वर्षी मराठा टायगर फोर्स आणि राजस्थान राज्य शिवजयंती समारोह समिती यांच्या विद्यमाने राजस्थानमध्ये शिवजयंती आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून मोगलांच्या कैदेतून निसटून राजस्थान मार्गे स्वराज्यात परतले होते. राजस्थानच्या भूमीशी महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि 18 फेब्रुवारी रोजी परमवीर मेजर सैतानसिंग स्टेडियम, बापू नगर फलोदी शहर राजस्थान येथे शिवदौड (हाफ मॅरेथॉन), मिरवणूक, व पुरस्कार वितरण सोहळा अशा स्वरूपात होणार आहे. राजस्थान येथील 36 विविध जाती धर्म जाती धर्माचे बांधव सहभाग घेणार आहेत.

 

याप्रसंगी शिशुपाल जांगू यांना छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार, हजारी मांजू छत्रपती शिवाजी महाराज समाज गौरव पुरस्कार, शिवप्रकाश ढाका छत्रपती शिवाजी महाराज गुणगौरव पुरस्कार, रामकिशन खारा छत्रपती शिवाजी महाराज रक्त मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच शिवाजी महाराजावर हिंदी भाषा व्याख्यान प्रा. शेखर पाटील देणार आहेत.

 

या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, संभाजी बिग्रेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, राजस्थान मधील केंद्रीय मंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवक समिती, तसेच सकल मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राज्यातील हजारो शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.